मुतखडा झालाय ? मग घरच्या घरी करा हे २० प्रभावशाली घरगुती उपाय. Kidney Stone Home Remedy in Marathi

किडनी स्टोन साठी घरगुती उपाय |Home Remedies for Kidney Stone.


home remedies for kidney stone in marathi
Home remedies for Kidney stone


१. मनुका : २५ ग्राम काळ्या मनुका रात्री ग्लासभर थंड पाण्यात भिजत टाकून सकाळी त्याच पाण्यात कुस्करून, गाळून, साखर मिसळून थोडे थोडे प्यावे.

२. ओवा : ओव्याचे चूर्ण व धणे प्रत्येकी चमचाभर एकत्र करून ग्लासभर ताकात भिजत टाकून २४ तासाने प्यावे. रोज संध्याकाळी भिजत टाकून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी याप्रमाणे तयार केलेले ताक नियमित ७ दिवस प्यावे. 

३. उंबर : उंबराच्या मुळीचा रस ६० ग्राम व साखर २० ग्राम एकत्र करून रोज सायंकाळी नियमित ७ दिवस प्यावे.

४. कांदा : कांद्याच्या २ चमचे रसात साखर मिसळून दिवसातून ३ वेळा ३ दिवस घ्यावे. 

५. शतावरी : ५ ग्राम शतावरीचा १ कप काढा, गायीच्या एक कप दुधात मिसळून रोज सकाळी नियमित ७ दिवस प्यावा. 

६. आवळा : १ चमचा आवळा रसात थोडी वेलची पावडर टाकून दिवसातून ३ वेळा काही दिवस चाटावे. 

७. कोहळा : कोहळ्याच्या मुळीचा चमचाभर रस ४ चमचे पाण्यात एकजीव करून रोज सायंकाळी नियमित ७ दिवस प्यावा. 

८. तुळस : अर्धा चमचा तुळशीचे बी, अर्धा चमचा जिरे व १ चमचा साखर हे सर्व एकत्र कुटून, कपभर दुधासह रोज सकाळी व रात्री नियमित २१ दिवस घ्यावे. 

९. पपई : पपईच्या मुळांचा १/४ काढा तयार करून १ चमचा प्रमाणात रोज सकाळ संध्याकाळ नियमित आठवडाभर प्यावा. 

१०. खरबूज : खरबुजाची बियांमधील मगज १ चमचा घेऊन वाटून, गाळून घ्यावा. रोज सकाळी ताजे बनवून नियमित ७ दिवस घ्यावा.

११. मुळ्याचे बी : ५० ग्राम मुळ्याचे बी, अर्धा लिटर पाण्यात उकळून निम्मे शिल्लक ठेवावे. थंड झाल्यावर गाळून रोज दरवेळी ताजे करून सकाळ संध्याकाळ नियमित ७ दिवस प्यावे. 

१२. लिंबू आणि सैंधव मीठ: एका लिंबूच्या रसात थोडे सैंधव मीठ मिसळून रोज सकाळ संध्याकाळ नियमित ४१ दिवस चाटल्याने उपयोग होतो. 

१३. कलिंगड : कलिंगडाचा २५ ग्राम रस व १ ग्राम जिरे पावडर एकजीव करून दिवसातून ३ वेळा ७ दिवस प्यावे. 

१४. रानतुळस: अर्धा चमचा रानतुळशीचे बी, दही व थोडा जुना गूळ एकत्र करून रात्री नियमित ७ दिवस खावा. 

१५. पांढरी रुई : पांढऱ्या रुईची ५०-६० फुले वाळवून त्याची वस्त्रगाळ पावडर करावी. पावडरच्या ८ पुड्या कराव्या. रोज सकाळी एक पुडी (पावडर) कपभर दुधात मिसळून ते दूध उकळावे व कोमट असताना प्यावे. हा उपचार ८ दिवस करावा. 

१६. भेंडी : रोज पाव किलो भेंड्या बारीक चिरून १ लिटर पाण्यात खूप वेळ शिजवाव्या, अर्धे पाणी शिल्लक राहिल्यावर उकळणे बंद करावे. हे पाणी थंड झाल्यावर प्यावे. रोज संध्याकाळी असे भेंडीचे पाणी तयार करून नियमित २१ दिवस प्यावे. 

१७. वेखंड : वेखंड व चमचाभर मध एकत्र करून सकाळी अनशेपोटी चाटून त्यावर ग्लासभर कोमट पाणी प्यावे. रोज सकाळी ७ दिवस हे चाटण अवश्य घ्यावे. 

१८. काकडी : काकडीच्या बी मधला चमचाभर गर, दारूहळदीचे चमचाभर चूर्ण या अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण हे सर्व तांदुळाच्या ग्लासभर धुवनात वाटून सकाळ संध्याकाळ नियमित ७ दिवस प्यावे. 

१९. कुळीथ : ५० ग्राम कुळीथ ८०० ग्राम पाण्यात रात्री भिजत टाकावे. सकाळी त्याच पाण्यात कुस्करून, गाळून अनशेपोटी प्यावे. असे रोज नियमित ४ महिने प्यायल्याने खूप चांगला फायदा होतो. 

२०. कडुनिंब : कडुनिंबाची वाळलेली पाने जाळून त्याची राख वस्त्रगाळ करून, २ ग्राम राख पाण्याबरोबर किंवा ताकाबरोबर रोज सकाळ संध्याकाळ काही दिवस नियमित घ्यावी. या प्रयोगामुळे मुतखडा विरघळून निघून जातो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या